महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आज आमटे सरांचा ‘क्लास’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 11:00 IST2021-05-29T10:59:55+5:302021-05-29T11:00:31+5:30
Prakash Amte News: संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांसह शिक्षण विभागातील सर्वच अधिकाऱ्यांना नव्या काळाची गरज ओळखून नेतृत्वाचे धडे दिले जाणार आहेत.

महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आज आमटे सरांचा ‘क्लास’
यवतमाळ : संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांसह शिक्षण विभागातील सर्वच अधिकाऱ्यांना नव्या काळाची गरज ओळखून नेतृत्वाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी शनिवारी डाॅ. प्रकाश आमटे आणि डाॅ. मंदाकिनी आमटे यांचा ऑनलाईन क्लास आयोजित करण्यात आला आहे.
शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व जिल्ह्यांच्या ‘डायट’चे प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आदी मंडळी या क्लासचे ‘विद्यार्थी’ असणार आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक विकासासाठी ‘ऑनलाईन व्यावसायिक विकास मंच’ सन २०२०-२१ मध्ये तयार करण्यात आला. त्याअंतर्गत गतवर्षी एकूण २८ खुले सत्र घेण्यात आली होती. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले होते.