अमित ढोरेने रचला इतिहास : हिमांकवर यवतमाळचा पहिला रायडर ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:20 IST2025-05-31T12:19:45+5:302025-05-31T12:20:42+5:30

Yavatmal : चार दिवसांत दुचाकीवरून १९ हजार २४ फूट अंतर पार

Amit Dhore creates history: He becomes Yavatmal's first rider to climb Himanka! | अमित ढोरेने रचला इतिहास : हिमांकवर यवतमाळचा पहिला रायडर ठरला!

Amit Dhore creates history: He becomes Yavatmal's first rider to climb Himanka!

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
अमित ढोरे या यवतमाळातील सीएने लेह लडाखमधील हिमांक पहाडी सर करून साहसिकतेचा प्रत्यय दिला आहे. १९ हजार २४ फूट उंच पहाडी सर करताना अमितला ४ दिवस लागले. या काळात तो न थांबता पहाडी सर करून गेला. यवतमाळातील पहिला रायडर त्याने हिमांक पहाडीवर नोंद केली आहे. यवतमाळातील अमित ढोरे ट्रॅकिंग आणि रायडिंगसाठी ओळखले जातात. गत दहा वर्षापासून ते साहसिकतेने रायडिंग आणि ट्रॅकिंग करीत आहे. आतापर्यंत अनेक उंच ठिकाणावर त्यांनी रायडिंग केले आहे. हिमांक ही पहाडी सर करणे त्यांच्यासाठी सर्वांत मोठी रायडिंग आहे. अमित सोबत त्यांच्या पत्नी तोषिता, यासोबतचदेशभरातील २० रायडर्सची टीम होती. या पहाडीवर पोहोचण्यासाठी लेहपासून बाईकने प्रवास करीत ८०० किलोमीटरचे अंतर अमितने पार केले. या काळात सोबत अतिरिक्त वाहनही ठेवले होते. पहाडी सर केल्यानंतर त्यांना सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले.


अशी आहे ओळख
हिमांकचे मुख्यालय लेह लदाख आहे. हिमांकची १९ हजार २४ फूट उंची आहे. हे जगात सर्वात उंच ठिकाण आहे. हा भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सीमा रस्ते संघटनेचा (BRO) एक प्रकल्प आहे. जो चीन सोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लदाखमध्ये मोटारी चालणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम आणि देखभाल करण्यासाठी स्थापन केला आहे.


या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट सियाचीन ग्लेशियर आणि पँगाँग त्सो सरोवर सारख्या मोक्याच्या क्षेत्रातील लष्करी तळ आणि चौक्यांपर्यंत वर्षभर प्रवेश प्रदान करणे आहे. स्पिटुक, थिक्से आणि दुबोंक सारख्या भागात टास्क फोर्ससह ब्रिगेडियर रॅकच्या मुख्य अभियंत्याच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प हिमांक या प्रदेशात भारताच्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षा वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
 

Web Title: Amit Dhore creates history: He becomes Yavatmal's first rider to climb Himanka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.