रुग्णवाहिकेला मेटॅडोरची धडक; अपघातात भावाचा मृत्यू, बहीण जखमी

By विलास गावंडे | Updated: September 1, 2023 20:55 IST2023-09-01T20:19:43+5:302023-09-01T20:55:27+5:30

यवतमाळ (नेर) येथील घटना

Ambulance hit by Matador; Brother dies in accident, sister injured in yavatmaal | रुग्णवाहिकेला मेटॅडोरची धडक; अपघातात भावाचा मृत्यू, बहीण जखमी

रुग्णवाहिकेला मेटॅडोरची धडक; अपघातात भावाचा मृत्यू, बहीण जखमी

विलास गावंडे

नेर : रुग्णवाहिकेला मेटॅडोरची धडक बसून झालेल्या अपघातात भाऊ ठार, तर बहीण जखमी झाली. ही घटना शुक्रवारी दुपारी ५.३० वाजताच्या सुमारास यवतमाळ मार्गावरील येलगुंडा गावाजवळ घडली. मोहम्मद नाशिरखाँ शेरखाँ पठाण (४४, रा.यवतमाळ), असे मृताचे नाव आहे. मुमताज बानो (२४) या जखमी झाल्या. त्यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

रुग्णवाहिका (क्र.एमएच २९ - एटी ०८५१) यवतमाळवरून नेरकडे येत होती. येलगुंडा गावाजवळ रुग्णवाहिकेवर मागावून येणारा मेटॅडोअर (क्रं.एमएच १५ - बीजे०१७१) धडकला. ही धडक एवढी जोरदार होती की, यात रुग्णवाहिका चक्काचूर झाली. यामध्ये रुग्णवाहिका चालवित असलेला मोहम्मद नाशिरखाँ शेरखाँ पठाण हा जागीच ठार झाला. मोहम्मद नाशिरखाँ हा बहीणीला घेऊन बाळेगाव येत जात होता. मार्गात अपघात झाला. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार बाळासाहेब नाईक यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक किशोर खंदार, जमादार मनोहर पवार, सुभाष ठाकरे, नीलेश सिरसाठ, रामधन पवार आदी करीत आहे.

Web Title: Ambulance hit by Matador; Brother dies in accident, sister injured in yavatmaal