शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेचे भाडे झाले चक्क उपचार खर्चाइतके !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

कोरोना महामारीच्या संकटात सर्वसामान्यांंना लूटण्यासाठी अनेक सापळे तयार झाले आहे. त्यातील रुग्णवाहिका हा एक मोठा सापळा आहे. चौपट भाडे आकारले जात आहे. परिवहन विभागाने रुग्णवाहिकेचे दर निश्चित केले असून त्याची सर्रास पायमल्ली केली जात आहे. रुग्णवाहिकेचा व्यवसाय सुरू झाला असून अनेकांनी कंडम झालेल्या रुग्णवाहिका खरेदी करून कुठलीही कागदपत्रे नसताना त्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला आहे.

ठळक मुद्देकोविडच्या नावाने लूट : जिल्ह्यात केवळ १५८ रुग्णवाहिका

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रुग्णसेवक म्हणून प्रतिमा तयार करण्यासाठी विविध सामाजिक संघटना, राजकीय पुढारी आपल्या नावाने रुग्णवाहिका सुरू करतात. प्रत्यक्षात हा सर्व देखावा असतो रोख रक्कम दिल्याशिवाय रुग्णाला ही वाहिका मिळत नाही. यात सेवाभाव कमी अन् व्यवहार तोही आर्थिक लूट करणारा केला जात आहे. परिवहन विभागात १५८ रुग्णवाहिकांची नोंद आहे. त्यात शासकीय रुग्णवाहिकांचा समावेश आहे. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात भंगार रुग्णवाहिका रस्त्यावर असून जीविताशी खेळ सुरू आहे.कोरोना महामारीच्या संकटात सर्वसामान्यांंना लूटण्यासाठी अनेक सापळे तयार झाले आहे. त्यातील रुग्णवाहिका हा एक मोठा सापळा आहे. चौपट भाडे आकारले जात आहे. परिवहन विभागाने रुग्णवाहिकेचे दर निश्चित केले असून त्याची सर्रास पायमल्ली केली जात आहे. रुग्णवाहिकेचा व्यवसाय सुरू झाला असून अनेकांनी कंडम झालेल्या रुग्णवाहिका खरेदी करून कुठलीही कागदपत्रे नसताना त्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला आहे.कोरोना पूर्वी नागपूरसाठी मारूती व्हॅनचे भाडे ३५०० होते. तर बोलेरोचे भाडे पाच हजार होते. शहरातल्या शहरात पाचशे रुपये भाडे आकारले जात होते. कोरोना काळात पीपीई किट व सॅनिटायझर, आॅक्सीजन खर्च येत असल्याचे कारण पुढे करीत नागपूरसाठी दहा हजार रुपये तर लोकलसाठी दोन हजार रुपये भाडे आकारले जात आहे. हाही दर रास्त असल्याचे सांगण्यात येते. मात्र काही महाभाग नागपूरला जाण्याकरिता २० हजार रुपये भाडे घेत आहे. लोकलमध्ये दोन हजार रुपयेपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात आहे. यातून गंभीर रुग्णाच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असून प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.