शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सभेत युती सरकारचा निषेध

By admin | Updated: January 21, 2016 02:11 IST

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाल्यानंतरही शासनाने जिल्ह्यातील केवळ दोन गावे मदतीस पात्र ठरविली. त्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी ठराव पारित करण्यात आला.

यवतमाळ : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाल्यानंतरही शासनाने जिल्ह्यातील केवळ दोन गावे मदतीस पात्र ठरविली. त्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी ठराव पारित करण्यात आला. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला तर भाजपा-सेनेने त्याला विरोध दर्शविला. भाजपा-सेना युती सरकारच्या निषेधाचा ठराव काँग्रेसचे देवानंद पवार यांनी मांडला. त्याला राष्ट्रवादीचे प्रवीण देशमुख यांनी अनुमोदन दिले. यावेळी शिवसेनेचे आशिष कुळसंगे आणि भाजपाचे अमन गावंडे यांनी तीव्र विरोध केला. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी मोहोड यांनी असा ठराव घेता येत नसल्याचे स्पष्ट केले. यावर सदस्यांनी आक्षेप नोंदवित लोकशाहीत असा कुठलाच कायदा नसल्याचे सांगितले. यातून वातावरण अधिकच तापले. यावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी सर्व सदस्यांच्या भावना राज्य शासनाकडे पाठविणार असल्याचे सभागृहात स्पष्ट केले. या सभेमध्ये अन्य विषयांवरही चर्चा झाली. या सभेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेमहाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव घेण्यात आला. काही विषयांवर बैठकीत खडाजंगीही झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, हा विषय सेनेचे सदस्य आशिष कुळसंगे यांनी सभागृहात मांडला. या ठरावाला सर्वानुमते संमती देण्यात आली.करंजी ग्रामपंचायत कर्मचारी रामचंद्र मानगी हे कोलाम जमातीचे असूनही ग्रामसेवक भरतीत ज्येष्ठतेनुसार त्यांचा विचार झाला नसल्याचा मुद्दा प्राजक्ता मानकर यांनी मांडला. डिजिटल शाळा, बिंदू नामावलीनुसार शिक्षक पदभरतीचा विषय मांडण्यात आला. यासोबतच संग्राम केंद्राचे संगणक आणि त्याची प्रणाली साशंक असल्याचा मुद्दा अमोल राठोड यांनी मांडला. दारव्हा तालुक्यातील चाणी प्रमाणे इतर संग्राम केंद्राची स्थिती वाईट असल्याच्या विषयावरही सभागृहात चर्चा झाली. (शहर वार्ताहर)