नक्षलवादी हल्यात तरोड्याचा वीर जवान अग्रमन रहाटे शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 19:52 IST2019-05-01T19:52:15+5:302019-05-01T19:52:38+5:30

गडचिरोली जिल्ह्यात आज (ता. १) झालेल्या भुसुरुंग स्फोटात तालुक्यातील तरोडा येथिल वीर जवान अग्रमन बक्षुजी रहाटे (वय 31) हे पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत.

Agriman Rahte martyr in Naxalite attack | नक्षलवादी हल्यात तरोड्याचा वीर जवान अग्रमन रहाटे शहीद

नक्षलवादी हल्यात तरोड्याचा वीर जवान अग्रमन रहाटे शहीद

यवतमाळ -  गडचिरोली जिल्ह्यात आज (ता. १) झालेल्या भुसुरुंग स्फोटात तालुक्यातील तरोडा येथिल वीर जवान अग्रमन बक्षुजी रहाटे (वय 31) हे पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. त्यांच्यावर तरोडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

अग्रमन बक्षुजी रहाटे (३१) रा. तरोडा हे गडचिरोलीपोलिस दलात सहा वर्षांपुर्वी दाखल झाले होते. नक्षलवादीविरोधी कारवाई करत असताना महाराष्ट्रदिनी त्यांना विरमरण आले. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. नातेवाइक त्यांचे पार्थिव आणायला गेले आहेत. अंत्यसंस्काराबद्दल आणखी वेळ निश्चित झालेला नाही, अशी माहिती तहसीलदार श्रीकांत निळे यांनी दिली.

Web Title: Agriman Rahte martyr in Naxalite attack