आंदोलनानंतर दिग्रसमध्ये शासकीय कापूस खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 06:00 AM2020-01-26T06:00:00+5:302020-01-26T06:00:22+5:30

जागरण जनमंच, युवा स्वाभिमान संघटना व शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यासाठी आंदोलन केले होते. दिग्रस ब्लॉक शेतकरी सहकारी जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग सोसायटीनेही स्वबळावर केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न केले होते. त्यानंतर आता जिनिंग प्रेसिंग सोसायटीतील शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. तहसीलदार राजेश वझिरे यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन झाले.

After the agitation, the government started buying cotton in Digras | आंदोलनानंतर दिग्रसमध्ये शासकीय कापूस खरेदी सुरू

आंदोलनानंतर दिग्रसमध्ये शासकीय कापूस खरेदी सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : येथे अद्यापही शासकीय कापूस संकलन केंद्र सुरू झाले नव्हते. विविध संघटना व शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आता शासकीय कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे.
जागरण जनमंच, युवा स्वाभिमान संघटना व शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यासाठी आंदोलन केले होते. दिग्रस ब्लॉक शेतकरी सहकारी जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग सोसायटीनेही स्वबळावर केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न केले होते. त्यानंतर आता जिनिंग प्रेसिंग सोसायटीतील शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. तहसीलदार राजेश वझिरे यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन झाले. पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक चक्रधर गोस्वामी, सहायक निबंधक केशव मस्के, शिरीष अभ्यंकर, राठोड, ठाणेदार सोनाजी आमले, जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र गावंडे, बाजार समिती सभापती साहेबराव चौधरी, भारत देशमुख, डॉ.प्रदीप मेहता, बाजार समिती सचिव राजकुमार ठाकरे, अरुण राठोड आदी उपस्थित होते. केंद्रावर प्रथम कापूस आणणाºया शेतकºयाचा यावेळी शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
तालुक्यात शासकीय कापूस खरेदी सुरू झाली नसल्याने व्यापारी अतिशय कमी दरात शेतकºयांचा कापूस खरेदी करत होते. याशिवाय खेडा खरेदीतही त्यांची लूट केली जात होती. आता कापूस संकलन केंद्र सुरू झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: After the agitation, the government started buying cotton in Digras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस