गर्दीच्या दुकानांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:00 AM2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:31+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता, इतर प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मात्र काही दिवसांपूर्वी चिकन, मटण विक्रीची दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली. अनेक दिवस ही दुकाने बंद असल्याने ज्या दिवशी ही दुकाने उघडली, त्या दिवशी वणीतील चिकन-मटण विक्रीच्या दुकानांवर नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाली. त्यामुळे प्रशासनाला चांगलाच घाम फुटला.

Action on crowded shops | गर्दीच्या दुकानांवर कारवाईचा बडगा

गर्दीच्या दुकानांवर कारवाईचा बडगा

googlenewsNext
ठळक मुद्देसहा जणांविरूद्ध गुन्हे : वाढत्या गर्दीवर प्रशासनाचा ‘वॉच’, गस्तीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : एकाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र दुकानदारांकडून ‘सोशल डिस्टंसींग’चा फज्जा उडविला जात असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात येताच, बुधवारी रात्री नगरपालिकेच्या पथकाने शहरातील सहा दुकानदारांविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी संबंधित दुकानदारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारत भादंवि १८८, २६९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता, इतर प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मात्र काही दिवसांपूर्वी चिकन, मटण विक्रीची दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली. अनेक दिवस ही दुकाने बंद असल्याने ज्या दिवशी ही दुकाने उघडली, त्या दिवशी वणीतील चिकन-मटण विक्रीच्या दुकानांवर नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाली. त्यामुळे प्रशासनाला चांगलाच घाम फुटला. एकीकीडे गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात असताना दुसरीकडे मांस विक्रीच्या दुकानांवर होणारी गर्दी चिंतेत टाकणारी होती. त्यामुळे प्रशासनाने मांस विक्री करताना ‘सोशल डिस्टंसींग’ पाळण्याचे आदेश संबंधित विक्रेत्यांना दिले. मात्र बुधवारी रात्रीत्याचे पालन होताना दिसले नाही. त्यामुळे नगरपालिकेच्या पथकाने ‘सोशल डिस्टंसींग’ चे उल्लंघन करणाऱ्या सहा चिकन, मटण विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली. यात शेख मोहम्मद अल कमल, हमीद चौैक, तमजीद अहेमद इंदिरा चौैक, तोहोद अहेमद शब्बीर, हमीद चौैक, मोहम्मद ईरफान अब्दुल रज्जाक, अनिस हॉलसमोर, वणी, तोकीर अहेमद व एका महिलेचा समोवश आहे. या कारवाईने मांस विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिसांनी संचारबंदी केली अधिक तीव्र
कोणतेही ठोस कारण नसताना घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नव्याने काही निर्णय घेतले आहे. त्यात जिवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी सहा ते दुपारी ३ वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी करीत गुरूवारी पहिल्याच दिवशी वणी पोलिसांनी संचारबंदी तिव्र केली. दुपारी ३ वाजतानंतर रस्त्यांवरून अकारण भटकणाºयांवर दंडुके उगारले. त्यामुळे काही वेळातच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.

Web Title: Action on crowded shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस