शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
10
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
11
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
12
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
13
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
14
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
15
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
16
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
17
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
18
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारप्रकरणातील आरोपीची आत्महत्या

By admin | Updated: October 3, 2015 02:14 IST

शहरालगतच्या डोर्ली येथील मतिमंद मुुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

मतिमंद मुलीचे अपहरण : मदत करणाऱ्यास अटकयवतमाळ : शहरालगतच्या डोर्ली येथील मतिमंद मुुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. तर सदर मुलीच्या अपहरणात मदत करणाऱ्या आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली. नितेश पंडितराव चौधरी (२६) रा. भाग्यनगर असे मृताचे नाव आहे. तो अत्याचारप्रकरणात मुख्य आरोपी आहे. त्याला वाजीद शेख (३५) रा. डोर्ली मतिमंद मुलीच्या अपहरणात मदत केली. डोर्ली येथील मतीमंद मुलगी मोहा येथील मुकबधीर विद्यालयात शिकायला होती. तिच्या शाळेला सुटी असल्याने ती घरी परत आली होती. शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी आरोपी नितेशने तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. वाजीद शेख याच्या दुचाकीने हे तिघे जण मोहदा येथील मूकबधिर शाळा परिसरात आले. आरोपीने शाळेच्या मागे असलेल्या शेतात कुकर्म केले. त्यानंतर तिला शाळेच्या आवारात सोडून पळ काढला. शाळेला सुटी असल्याने तेथे कर्तव्यावर असलेल्या चौकीदाराला शंका आली. त्याने ही बाब शाळेतील शिक्षकाला सांगितली. शिक्षकाने सदर मुलीला तिच्या डोर्ली येथील घरी आणून सोडले. मुलीला मोहदा येथे कोणी सोडले याचा धक्काच घरच्या मंडळीला बसला. त्यांनी सदर मुलीकडे चौकशी केली असता तिने संपूर्ण हकीकत सांगितली. इतकेच नव्हे तर आरोपींची ओळखही पटविली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी नितेश पंडितराव चौधरी आणि त्याचा सहकारी वाजीद शेख यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला. दरम्यान आरोपी नितेश चौधरी याने गावातीलच शेत शिवारात गळफास लावून आत्महत्या केली. तर आरोपी वाजीद शेख याला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात येणार आहे. या घटनेचा तपास उपनिरीक्षक मंगेश भोयर, शिपाई जाधव करत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)