दोन खुनातील आरोपी मोकाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 05:00 IST2022-05-23T05:00:00+5:302022-05-23T05:00:24+5:30

पॅराेलवर आलेल्या वैभव नाईक याचा निदर्यपणे खून करण्यात आला. इतकेच नव्हे तर त्याच्या दोन साथीदारांनाही जीवानिशी मारण्याचा प्रयत्न झाला. यात ते सुदैवाने बचावले. या गुन्ह्यातील नऊ आरोपी ७ मेच्या रात्रीपासून पसार आहे. त्यांचा अजूनही शोध लागलेला नाही. याशिवाय आरटीओ कार्यालय परिसरात गांजा विक्री होणाऱ्या पानटपरीवर दगडाने ठेचून युवकाचा खून झाला. यातील आरोपींना अटक झाली. मात्र मृतक कोण याची अजूनही ओळख पोलिसांना पटविता आली नाही.

Accused of two murders acquitted | दोन खुनातील आरोपी मोकाटच

दोन खुनातील आरोपी मोकाटच

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील खून, चोरी या गंभीर घटनांचा तपासच केला जात नाही. केवळ येथील पोलीस ठाणे व अधिकारी महिन्याचा हिशेब जुळविण्यातच व्यस्त आहे. अवधूतवाडी, शहर, लोहारा या तीनही पोलीस ठाण्यांची अवस्था अतिशय बकाल झाली आहे. पोलीस मुख्यालयी असलेल्या पोलीस ठाण्यांमध्येच तपासाच्या नावाने बोंबाबोंब आहे. पाटीपुऱ्यातील खुनाच्या घटनेला १३ दिवस झाले आहे. यातील एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही. एकच बॅंक दोन वेळा फोडणाऱ्या चोरट्यांचाही सुगावा लागला नाही. 
पॅराेलवर आलेल्या वैभव नाईक याचा निदर्यपणे खून करण्यात आला. इतकेच नव्हे तर त्याच्या दोन साथीदारांनाही जीवानिशी मारण्याचा प्रयत्न झाला. यात ते सुदैवाने बचावले. या गुन्ह्यातील नऊ आरोपी ७ मेच्या रात्रीपासून पसार आहे. त्यांचा अजूनही शोध लागलेला नाही. याशिवाय आरटीओ कार्यालय परिसरात गांजा विक्री होणाऱ्या पानटपरीवर दगडाने ठेचून युवकाचा खून झाला. यातील आरोपींना अटक झाली. मात्र मृतक कोण याची अजूनही ओळख पोलिसांना पटविता आली नाही. अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तर केवळ गुन्हे दाखल करण्याचे काम केले जाते. चोरीचा एकही गुन्हा आजतागायत उघडकीस आणला नाही. कर्मचारी नाही, अधिकारी नाही अशी ओरड करीत वेळ मारून नेली जाते. सर्वाधिक गुन्हे दाखल होणाऱ्या पोलीस ठाण्याची तपास यंत्रणा केवळ लाभाच्या गुन्ह्यांवरच लक्ष केंद्रीत करणारी आहे. या ठिकाणी प्रत्येक बाबीचे दर निश्चित झाले आहे. असे गुन्हे सोईस्करपणे उघड होतात. सर्वसामान्यांच्या तक्रारींची मात्र दखल घेतली जात नाही. स्थानिक गुन्हे शाखाही मर्यादितच झाली              आहे. 
एकीकडे शहरात गंभीर गुन्हे व त्यातील आरोपी पोलिसांना मिळत नाही. तर दुसरीकडे राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहे. लॉजिंगच्या नावाखाली दिवसाढवळ्या कुंटणखाने चालविले जातात. आयपीएल क्रिकेट सट्टा, जुगार, जनावर तस्करी, रेती तस्करी, अवैध दारू विक्री या ना अशा अनेक अवैध धंद्यातून आर्थिक उलाढाल होत आहे. या धंद्यांना संरक्षण देण्याचेच काम सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध धंदे चालू देणार नाही असे ठामपणे सांगितले आहे. मात्र, त्यांचा हा आदेश यवतमाळ शहरात तरी सर्वांसाठी फायद्याचाच ठरत आहे. हप्ते दुप्पट वाढवून घेतले जात आहे. 

येळाबारातील खूनही अनडिटेक्ट
- वडगाव जंगल पोलीस ठाण्यांतर्गत येळाबारा येथील ३५ वर्षीय इसमाचा गळा आवळून खून करण्यात आला. त्याचे प्रेत दगडाला बांधून वाघाडी प्रकल्पात फेकण्यात आले. या गुन्ह्यातीलही आरोपी पोलिसांना मिळालेले नाही. हा खूनसुद्धा अनडिटेक्ट आहे. खुनाचे नेमके कारणही पोलिसांना गवसलेले नाही.

घरफोड्या व चोरींचा हिशेब नाही
- अवधूतवाडी व लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने घरफोडी व चोरीच्या घटना घडत आहेत. यातील एकही गुन्हा आतापर्यंत उघड झालेला नाही. चोरीच्या गुन्ह्याचा तपासच करायचा नाही, असे येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ठरवून घेतले की काय असेच चित्र आहे. त्यांना वरिष्ठही या गुन्ह्यांच्या तपासाबाबत विचारणा करताना दिसत नाही. 

 

 

Web Title: Accused of two murders acquitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.