‘एसीबी’च्या वाहनाला अपघात, तिघे जखमी

By Admin | Updated: May 7, 2015 01:46 IST2015-05-07T01:46:18+5:302015-05-07T01:46:18+5:30

येथील दिग्रस मार्गावर पुसदपासून चार किलोमीटर अंतरावर वरूडजवळ टाटा इंडिका व मालवाहू अ‍ॅपे आॅटोची समोरासमोर धडक झाली.

Accident of ACB vehicle, three injured | ‘एसीबी’च्या वाहनाला अपघात, तिघे जखमी

‘एसीबी’च्या वाहनाला अपघात, तिघे जखमी

पुसद : येथील दिग्रस मार्गावर पुसदपासून चार किलोमीटर अंतरावर वरूडजवळ टाटा इंडिका व मालवाहू अ‍ॅपे आॅटोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार जण जखमी झाले.
जखमींमध्ये यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे तीन कर्मचारी व अ‍ॅपे चालकाचा समावेश आहे. ही घटना बुधवारी दुपारी येथील मानस ढाब्यासमोर घडली. जखमींमध्ये एसीबीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार जामकर, शिपाई भारत चिरडे, किरण खेडेकर व अ‍ॅपेचालक माधव जाधव यांचा समावेश आहे. एसीबीचे कर्मचारी टाटा इंडिका एम.एच.२६/ई-१८२६ ने दिग्रसहून पुसदकडे जात होते. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या अ‍ॅपे एम.एच.२९/एम-८८५२ सोबत समोरासमोर धडक झाली. जखमींना नागरिकांनी प्रथम पुसद उपजिल्हा रुग्णालयात नेले. या प्रकरणी एसीबीचे नंदकुमार जामकर यांच्या तक्रारीवरून अ‍ॅपेचालकावर गुन्हा नोंदविण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Accident of ACB vehicle, three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.