शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अभिजितचा खून पतंगाच्या वादातून, खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना अखेर यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 4:57 AM

केंद्रीय विद्यालयाचा सहाव्या वर्गाचा विद्यार्थी अभिजित टेकाम याच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे.

यवतमाळ : केंद्रीय विद्यालयाचा सहाव्या वर्गाचा विद्यार्थी अभिजित टेकाम याच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. हा खून पतंगाच्या क्षुल्लक कारणातून झाल्याचे निष्पन्न झाले. तीन विधीसंघर्ष बालकांनी नशेच्या अंमलात हे कृत्य केल्याचे पोलिसांपुढे कबूल केले. यासोबत सूरजनगर परिसरात बालकांमधील नशेचे धक्कादायक वास्तवही पोलिसांनी समाजापुढे आणले आहे.अभिजित दीपक टेकाम (१२) रा. डेहणकर ले-आऊट यवतमाळ, या बालकाचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत शनिवारी सकाळी पोलिसांना आढळून आला होता. घटनेनंतर सातव्या दिवशी खुनाचे रहस्य उलगडण्यात उपविभागीय पोलीस अधिकार पीयूष जगताप यांच्या नेतृत्वातील विविध पथकांना यश आले. यात पोलिसांनी तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. अभिजित हा शुक्रवारी सायंकाळी ट्युशनवरून परत येत होता. तेव्हा त्याला कटलेली पतंग दिसली. ही पतंग मिळविण्यासाठी तो झुडपी जंगल परिसरात गेला. मांजा गुंडाळत असताना तिघांनी त्याच्या जवळचा पतंग हिसकावून घेतला. अभिजितने विरोध करताच नशेच्या अंमलात असलेल्या तिघांनी त्याला बेदम मारहाण केली. यात अभिजित बेशुद्ध पडला. नंतर त्याला ओढत नेऊन सागाच्या झुडपात टाकले. तिघेही एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी सलग तिनदा अभिजितच्या डोक्यावर मोठा दगड टाकला. यात अभिजित जागीच गतप्राण झाला. त्यानंतर तिघेही घराकडे निघून गेले.अभिजित शुक्रवारी सायंकाळी ४ वाजतापासूनच बेपत्ता होता. तो शिकवणीला गेल्यानंतर घरी परतला नाही. त्यामुळे वडिलांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची तक्रारी दिली. मात्र दुसºया दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांपुढे मारेकरी शोधण्याचे आव्हान होते. सुरूवातीला पोलिसांनी या परिसरात भटकणाºया तरूणांवर लक्ष केंद्रीत केले. या भागात नशा करण्यासाठी अनेक जण येत असल्याचे सांगण्यात येत होते. हा धागा पकडून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली आणि सहा दिवसानंतर अभिजितचे मारेकरी सापडले. हा आव्हानात्मक तपास पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, एलसीबीचे निरीक्षक संजय देशमुख, ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पाच पथकांनी केला. त्यात टोळी विरोधी पथकाचे प्रशांत गिते, संतोष मनवर, वडगाव रोड शोध पथकाचे सुगत पुंडगे, गोरख चौधर, स्थानिक गुन्हे शाखेतील सारंग मिराशी यांच्यासह ऋषी ठाकूर, संजय दुबे, गजानन धात्रक, किरण पडघण, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, आशीष गुल्हाने, विनोद राठोड, बंडू मेश्राम, आकाश सहारे, आकाश मसनकर, शशिकांत चांदेकर, सूरज गजभिये, जयंत शेंडे, शंकर भोयर यांचा समावेश आहे.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा