चारचाकी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
By विलास गावंडे | Updated: August 17, 2022 21:44 IST2022-08-17T21:43:10+5:302022-08-17T21:44:28+5:30
विशाल हा १३ ऑगस्ट रोजी यवतमाळ येथील कामे आटोपून रात्री ८ वाजताच्या सुमारास गावी हिवरी येथे मोटरसायकलने (एमएच-२९-बीक्यू-४८०९) जात होता.

चारचाकी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
हिवरी (यवतमाळ) : चारचाकी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मंगळवारी रात्री मृत्यू झाला. विशाल वाल्मिक कांडेलकर (वय -२३, रा. हिवरी ता. यवतमाळ) असे या युवकाचे नाव आहे.
विशाल हा १३ ऑगस्ट रोजी यवतमाळ येथील कामे आटोपून रात्री ८ वाजताच्या सुमारास गावी हिवरी येथे मोटरसायकलने (एमएच-२९-बीक्यू-४८०९) जात होता. मार्गात त्याला वडगाव रोड येथे एमएच-१२-एचएन-९६७८ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने धडक दिली. या घटनेत विशालचा पाय मोडला. त्याला सावंगी मेघे (जि. वर्धा) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पायावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. १६ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला