पायवा खोदताना भिंत कोसळून मजुराचा मृत्यू

By विलास गावंडे | Updated: March 14, 2023 18:35 IST2023-03-14T18:34:45+5:302023-03-14T18:35:49+5:30

कळंब तालुक्यातील घटना

A laborer died when a wall collapsed while digging a pipe | पायवा खोदताना भिंत कोसळून मजुराचा मृत्यू

पायवा खोदताना भिंत कोसळून मजुराचा मृत्यू

कळंब (यवतमाळ) : घरासाठी पायवा खोदताना भिंत कोसळून वृद्ध मजुराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी परसोडी (बु) येथे घडली. कैलास काशीनाथ ढोले असे या मजुराचे नाव आहे.

परसोडी (बु) येथील जगताप यांच्या घरासाठी कैलास ढोले पायवा खोदत होते. सोबत तीन मजूरही होते. हे काम करत असताना बाजूची भिंत ढोले यांच्या अंगावर कोसळली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेचा तपास कळंब पोलिस करीत आहे.
 

Web Title: A laborer died when a wall collapsed while digging a pipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.