शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

भोसा परिसरात ८०० पोलिसांचा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 5:00 AM

बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी गृहउपअधीक्षक बागबान तर उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांना परिसर विभागून दिला आहे. जफरनगर येथील उर्दू शाळेत तर मेमन सोसायटीतील मैदानात या अधिकाऱ्यांचे कार्यालय उघडले आहे. ३५० पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड व ६० पोलीस अधिकारी तैनात आहे. गल्लीबोळातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे सतत फिरत आहे.

ठळक मुद्देकोरोना रुग्ण आढळल्याने घरोघरी सर्वेक्षण : तीन किलोमीटरचा परिसर सील, दोन ड्रोन कॅमेरांची नजर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भोसा रोड परिसरातील एकाच भागात राहणारे आठ जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाने हा संपूर्ण परिसर सील केला असून तीन किलोमीटर अंतरात कुणालाही एन्ट्री नाही. या ठिकाणी ८०० पोलीस कर्मचारी-अधिकारी २४ तास खडा पहारा देत आहेत. तसेच दोन ड्रोन कॅमेरांद्वारे हालचालींवर नजर ठेवली जात आहे.शहरातील प्रभाग क्र. १० व २० मध्ये येणाऱ्या परिसरातील इंदिरानगर, पवारपुरा, भोसा रोड, हिंदु स्मशानभुमी परिसर, कोहिनूर सोसायटी, गुलमोहर सोसायटी, शहदाब बाग, रुग्णालय सोसायटी, कापसे ले-आऊट, बिलालनगर, अलमासनगर, नागसेन सोसायटी, सिध्देश्वरनगर समोरचा परिसर, तायडेनगर, अलकबीरनगर, बाबा लेआऊट, फैझनगर, अलहबीब सोसायटी, गुलशननगर तर प्रभाग क्र.२० मधील भोसा गावठाण, गोल्डन पार्क रोड, डेहनकर ले-आऊट भाग १-२, सव्वालाखे ले-आऊट, मंगेशनगर, सुंदरनगर, क्रिसेंट शाळा परिसर, मेमन सोसायटी, मालानी झोपडपट्टी, रुख्मीणीनगर, संजय गांधीनगर, बोरेलेनगर भाग २, तांडा वस्ती, डी.एड. कॉलेज परिसर, शंभरकर ले-आऊट, अंबर लॉन परिसर, सारस्वत ले-आऊट, प्रभातनगर या भागातील केंद्रबिंदूपासून ३ किलोमीटरच्या परिसरापर्यंत नागरिकांची हालचाल, फिरणे, संपर्क यावर निर्बंध घालण्यात आले आहे. तसेच या वस्त्यांमधील ३ कि.मी परिघाच्या क्षेत्राची सीमा सील बंद केली आहे.या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला आहे. बुधवारी रात्रीच जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्यासह आरोग्य विभाग, महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा या ठिकाणी पोहोचला. तातडीने उपाययोजना करीत गुरुवारी सकाळपासूनच प्रत्येक घरातील व्यक्तीचे सर्वेक्षण सुरू केले आहे.येथील बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी गृहउपअधीक्षक बागबान तर उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांना परिसर विभागून दिला आहे. जफरनगर येथील उर्दू शाळेत तर मेमन सोसायटीतील मैदानात या अधिकाऱ्यांचे कार्यालय उघडले आहे. ३५० पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड व ६० पोलीस अधिकारी तैनात आहे. गल्लीबोळातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे सतत फिरत आहे. नियंत्रण कक्षातून तत्काळ परिसरातील पोलिसांना हालचालींची माहिती दिली आहे. कुणीही घराबाहेर पडूच नका अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. तर आशा स्वयंसेविकेला सुरक्षा प्रदान केली आहे.‘ते’ दिल्ली रिटर्न रुग्ण दोन दिवस होते नेरमध्ये मुक्कामीनेर : दिल्लीच्या संमेलनातून परत आलेले आणि आता कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण म्हणून यवतमाळच्या मेडिकलमध्ये दाखल असलेले काही जण नेरमध्ये दोन दिवस मुक्कामी होते. गुरुवारी ही माहिती प्रशासनापुढे येताच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात आला. आठ कोरोना बाधितांपैकी चार जण काही दिवसांपूर्वी नेर येथे दोन दिवस मुक्कामी राहून गेले. या काळात चमननगर परिसरातील ५२ जण त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे या ५२ जणांना क्वारंटाईन केले जाणार आहे. शिवाय रुग्णांनी जेथे मुक्काम ठोकला तो परिसरही सील केला जाणार आहे. उपविभागीय अधिकारी उदयसिंह चंदेल यांनी गुरुवारी नेर येथे भेट दिली. ५२ जणांना ताब्यात घेऊन क्वारंटाईनची प्रक्रिया सुरू होती. नेर तालुक्यात सुरुवातीला विदेशवारीहून आलेल्या चार जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र १४ दिवसानंतरही त्यांच्यात कोणतेही लक्षणे आढळून न आल्याने त्यांना क्वारंटाईनमुक्त करण्यात आले. एकाच शहरातील तब्बल ५२ जण एकाच दिवशी क्वारंटाईन होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले.नेर, बाभूळगावमध्ये संशयितांचा शोधदिल्लीच्या मरकजमधून परतलेल्यांपैकी सात जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. या सात जणांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा आता प्रशासनाने शोध सुरू केला आहे. तब्बल ४७ जण या रुग्णांच्या संपर्कात आल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली. त्यांना शोधून क्वारंटाईन करण्यासाठी गुरुवारी पोलीस आणि आरोग्य कर्मचाºयांनी नेर, बाभूळगाव, सावर परिसराला भेट दिली. दरम्यान गुरुवारी मेडिकल प्रशासनाने ७८ जणांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविले. शिवाय कोरोनाग्रस्तांनी वास्तव्य केलेल्या यवतमाळच्या प्रभाग १० आणि २० मधील तब्बल ३३ हजार नागरिकांचा डोअर-टू-डोअर सर्वे केला जाणार नाही. त्यासाठी कर्मचाºयांच्या ९० चमू फिरत आहे.मुख्याधिकारी देणार अत्यावश्यक सेवा पासयवतमाळ नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना अत्यावश्यक सेवा पास देण्याचे अधिकार दिले आहेत. शहरातील सील केलेल्या परिसरात जाण्यासाठी या पास राहणार आहे. पासधारकांची यादी संबंधित पोलीस ठाण्यात तात्काळ उपलब्ध करून द्यावी. पोलिस स्टेशन अधिकारी यांनी नेमुन दिलेल्या ठराविक वेळेत परवाना व पासेसधारकांना आवश्यक सेवा पुरविण्याची मुभा राहील. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करताना सोशल डिस्टन्सिंगचे व इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी व त्यांच्या अधिनस्त कर्मचाºयांकडून केली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस