CoronaVirus News: जिल्ह्यात 59 जणांना सुट्टी; 48 जण नव्याने पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 18:01 IST2020-10-13T17:57:18+5:302020-10-13T18:01:00+5:30
मृत झालेल्यामध्ये यवतमाळ शहरातील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

CoronaVirus News: जिल्ह्यात 59 जणांना सुट्टी; 48 जण नव्याने पॉझिटिव्ह
यवतमाळ: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 59 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात एका कोरानाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 48 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.
मृत झालेल्यामध्ये यवतमाळ शहरातील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत 536 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9148 झाली आहे. मंगळवारी 59 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8233 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 290 मृत्युची नोंद आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 81720 नमुने पाठविले असून यापैकी 80778 प्राप्त तर 942 अप्राप्त आहेत. तसेच 71630 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.