शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

५३ टक्के पालक म्हणतात, शाळा लगेच सुरू करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शालेय सत्राबाबत असलेली अनिश्चितता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर संपविली आहे. उर्वरित महाराष्ट्रातील शालेय सत्र १५ तर विदर्भातील शालेय सत्र २६ जूनपासूनच सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र त्या-त्या जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या स्थानिक प्रशासनाला सूचना आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या सर्वेक्षणातील तथ्य : अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द, कोरोनाची परिस्थिती पाहूनच निर्णयाची शक्यता

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या शाळा २६ जूनपासून सुरू करता येतील का, याबाबत प्रशासनाने जिल्हाभरातील पालकांकडून आढावा घेतला. हा अहवाल शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला. मात्र यात ५३ टक्के पालकांनी तुर्त शाळा सुरू करण्यास विरोध दर्शविला असून फक्त २४ टक्के पालकांनी शाळा सुरू करण्याबाबत मत नोंदविले आहे.कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शालेय सत्राबाबत असलेली अनिश्चितता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर संपविली आहे. उर्वरित महाराष्ट्रातील शालेय सत्र १५ तर विदर्भातील शालेय सत्र २६ जूनपासूनच सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र त्या-त्या जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या स्थानिक प्रशासनाला सूचना आहे.त्यानुसार, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सर्व शाळा व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेऊन याबाबत आढावा घेण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. आॅनलाईन लिंकद्वारे घेतलेला हा आढावा आता गोळा झाला असून एकत्रित अहवाल शुक्रवारी जिल्हाधिकाºयांना सोपविल्याची माहिती शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी दिली.या आढाव्यात २६ जूनपासून शाळा सुरू कराव्या का, असा स्पष्ट प्रश्न शाळा व्यवस्थापन समित्यांना विचारण्यात आला होता. त्यात ५३ टक्के समित्यांनी स्पष्ट नकार दर्शविला. शिवाय २३ टक्के समित्यांनी हो किंवा नाही, असे कोणतेही मत नोंदविले नाही. फक्त २४ टक्के समित्यांचाच शाळा सुरू करण्यास होकार दिल्याचे सांगण्यात आले.शाळा सुरू केल्यास ती नियमित भरवावी, एक दिवसाआड भरवावी की दोन पाळीत भरवावी? किती शिक्षक, पालक अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल, दीक्षा अ‍ॅप वापरतात? किती शिक्षक मुख्यालयी राहातात? किती अपडाऊन करतात? गावात डीएड, बीएडधारक स्वयंसेवी किती आहेत? ग्रामपंचायतीकडून १५ व्या वित्त आयोगातून शाळेत हॅण्डवॉश, सॅनिटायझर, मास्क, साबण, शाळा निर्जंतुकीकरण आदी सोयी होतील का? पोषण आहार वाटपाचे नियोजन काय? पटसंख्या १० पेक्षा कमी आहे का? आदी बाबींचाही आढावा जिल्हा परिषदेकडून घेण्यात आला आहे.सोमवारी होणार अंतिम निर्णयशाळा सुरू करण्याबाबतच्या मतांचा अहवाल शुक्रवारी शिक्षण विभागाने जिल्हाधिकाºयांना सोपविला. आता सोमवारी जिल्हाधिकारी, सीईओ व शिक्षण विभागाची बैठक होणार आहे. त्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय होईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले. तर शाळांबाबतचा निर्णय सीईओच सविस्तर सांगतील, असे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह म्हणाले.अर्ध्या जिल्ह्यात स्थिती कठीणशाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने १५ जून रोजी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन शाळेबाबत निर्णय घेण्याची सूचना आहे. जिल्ह्यात सध्या दारव्हा, उमरखेड, पुसद, महागाव, नेर, दिग्रस आणि आर्णीसह यवतमाळात अद्यापही कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या तालुक्यांमधील शाळांच्या बाबतीत जिल्हाधिकारी, सीईओ काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा