यवतमाळ जिल्ह्यात 50 जण कोरोनामुक्त ; 37 नव्याने पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 20:13 IST2020-12-15T20:13:12+5:302020-12-15T20:13:19+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 309 रिपोर्ट प्राप्त झाले.

यवतमाळ जिल्ह्यात 50 जण कोरोनामुक्त ; 37 नव्याने पॉझिटिव्ह
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 50 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर गत 24 तासात जिल्ह्यात 37 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 309 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 37 जण नव्याने पॉझिटिव्ह तर 272 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 288 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12049 झाली आहे. 24 तासात 50 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11379 आहे. तर जिल्ह्यात एकूण 382 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 117810 नमुने पाठविले असून यापैकी 117142 प्राप्त तर 668 अप्राप्त आहेत. तसेच 105093 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.