यवतमाळात शासकीय वसतीगृहाच्या ४०० विद्यार्थ्यांनी पुकारले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 14:34 IST2019-03-07T14:34:02+5:302019-03-07T14:34:31+5:30
विविध मागण्यांसाठी येथील चार शासकीय वसतीगृहाच्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी गुरुवारपासून आंदोलन छेडले आहे.

यवतमाळात शासकीय वसतीगृहाच्या ४०० विद्यार्थ्यांनी पुकारले आंदोलन
ठळक मुद्देवसतीगृहाला ठोकले कुलूप
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: विविध मागण्यांसाठी येथील चार शासकीय वसतीगृहाच्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी गुरुवारपासून आंदोलन छेडले आहे. प्रकल्प अधिकारी आल्याखेरीज आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तसेच या विद्यार्थ्यांनी चारही वसतीगृहांना कुलूप ठोकले असून आपण रात्रीही आवारातच बसणार असल्याचे जाहीर केले आहे. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.