शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

११ मजुरांचा ४०० किलोमीटरचा पायदळ प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

हैद्राबाद येथून जवळपास ४०० किलोमीटरचा पायदळ प्रवास करीत रविवारी रात्री पुसदला पोहोचले. गस्तीवरील पोलिसांनी त्यांना घेऊन तालुका कोरोना नियंत्रण समितीच्या ताब्यात दिले. प्रशासनाने या सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करुन येथील नगर परिषदेच्या अण्णाभाऊ साठे मराठी प्राथमिक शाळेत त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था केली.

ठळक मुद्देपुसदमध्ये पोहोचले : तेलंगाणा राज्यातून मध्य प्रदेशकडे निघाले, आरोग्य तपासणी करुन भोजन व निवासाची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने मध्यप्रदेशातील दोन महिलांसह ११ मजूर तेलंगाणात अडकून पडले. ते हैद्राबाद येथून जवळपास ४०० किलोमीटरचा पायदळ प्रवास करीत रविवारी रात्री पुसदला पोहोचले. गस्तीवरील पोलिसांनी त्यांना घेऊन तालुका कोरोना नियंत्रण समितीच्या ताब्यात दिले. प्रशासनाने या सर्व मजुरांची आरोग्य तपासणी करुन येथील नगर परिषदेच्या अण्णाभाऊ साठे मराठी प्राथमिक शाळेत त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था केली.पुसदला पोहोचलेले सर्व मजूर लांजी ता. बालाघाट (मध्यप्रदेश) येथील रहिवासी आहे. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावापूर्वी मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील दोन महिलांसह एकूण ११ मजूर तेलंगाणा राज्यात पोटाची खळगी भरण्यासाठी गेले होते. देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने हे सर्व मजूर तेलंगाणा राज्यात अडकून पडले. त्यांना घराची ओढ लागली होती. त्यामुळे त्यांनी पायदळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ४०० किलोमीटरचा पायदळ प्रवास करीत ते रविवारी पुसदला पोहोचले. गस्तीवरील पोलिसांना हे सर्व मजूर येताना आढळले. त्यांनी लगेच तहसीलदारांना माहिती दिली. त्यानंतर त्यांची तपासणी करून त्यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली.कोरोनाची लक्षणे नाहीतहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांच्या मार्गदर्शनात डॉ. दिनेश चव्हाण यांच्या पथकाने या सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी केली. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाही. या सर्वांना पालिकेच्या अण्णाभाऊ साठे मराठी प्राथमिक शाळेत ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या