यवतमाळमध्ये 40 पॉझिटिव्ह रुग्णांची भर, 16 जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 06:48 PM2020-07-28T18:48:38+5:302020-07-28T18:48:50+5:30

यात पांढरकवडा येथील मशीद वार्डातील 17 पुरुष व 14 महिला, पुसद येथील 3 पुरुष व 2 महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष, दारव्हा येथील दोन पुरुष व एक महिलेचा समावेश आहे. 

40 positive patients in Yavatmal, 16 discharged | यवतमाळमध्ये 40 पॉझिटिव्ह रुग्णांची भर, 16 जणांना डिस्चार्ज

यवतमाळमध्ये 40 पॉझिटिव्ह रुग्णांची भर, 16 जणांना डिस्चार्ज

Next

यवतमाळ: जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून आज (दि.28) पुन्हा 40 पॉझिटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 16 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मंगळवारी नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 40 जणांमध्ये 23 पुरुष व 17 महिलांचा समावेश आहे. यात पांढरकवडा येथील मशीद वार्डातील 17 पुरुष व 14 महिला, पुसद येथील 3 पुरुष व 2 महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष, दारव्हा येथील दोन पुरुष व एक महिलेचा समावेश आहे. 

जिल्ह्यात सोमवारपर्यंत ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 300 होती. यात आज 40 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 340 वर पोहोचला. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 16 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 324 आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 292 तर रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आलेले 32 जण आहेत. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 852 झाली आहे. यापैकी 502 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

तर जिल्ह्यात 26 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 82 जण भरती आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 100 नमुने तपासणीकरीता पाठविले. महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 14251 नमुने पाठविले असून यापैकी 12408 प्राप्त तर 1843 अप्राप्त आहेत. तसेच 11556 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: 40 positive patients in Yavatmal, 16 discharged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.