घाटंजीत ४० लाखांच्या कापसाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 21:56 IST2019-02-23T21:56:11+5:302019-02-23T21:56:54+5:30
येथील चोरांबा मार्गावरील जिनिंगमधील कापसाला आग लागून जवळपास ३० ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गिल अँड कंपनी नावाच्या या जिनिंगमध्ये शिव अॅग्रो इंडस्टिजच्या मालकीचा कापूस ठेवून होता.

घाटंजीत ४० लाखांच्या कापसाला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : येथील चोरांबा मार्गावरील जिनिंगमधील कापसाला आग लागून जवळपास ३० ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
गिल अँड कंपनी नावाच्या या जिनिंगमध्ये शिव अॅग्रो इंडस्टिजच्या मालकीचा कापूस ठेवून होता. शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास या कापसा गंजीला अचानक आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या गंजीमध्ये ७०० ते ८०० क्विंटल कापूस होता, असे सांगण्यात आले. आगीवर लवकर नियंत्रण मिळविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेने घाटंजी शहरात खळबळ उडाली होती.