शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यात ३१३ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST

तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ यांनी सांगितले. यात शेती व फळ पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या नुकसानीचा समावेश करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देबळीराजावर अस्मानी संकट : गहू, हरभरा, संत्रा पिकांना फटका, शासनाकडून मदतीची प्रतीक्षा

प्रकाश लामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असतानाच तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने ३१३.६ हेक्टरवरील पिके उद्घवस्त झाली. यामध्ये गहू, हरभरा, संत्रा आदी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असून बळीराजा पुन्हा हवालदिल झाला आहे.तालुक्यात २८ मार्चला ०.४४ मिमी, २९ मार्च रोजी ४.६६ मिमी, तर ३० मार्चला ४.६६ मिमी पाऊस कोसळला. या तिन्ही दिवशी रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वाºयाने त्यात भर घातल्याने ३१३.६ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. यंदा तालुक्यात आठ हजार ५७६ हेक्टरवर गहू, तर नऊ हजार ८४३ हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली. ज्वारी ११२ हेक्टर, मका १०६ हेक्टर, तीळ १६ हेक्टर, संत्रा २५.३५ हेक्टर, भुईमूग १७२ हेक्टर, ऊस ५३७ हेक्टर, भाजीपाला ७४१ हेक्टर, फुलशेती ६.८० हेक्टर, तर हळद ५.२५ हेक्टरवर लागवड झाली. याशिवाय १७७ हेक्टरवर चारा पिके लावण्यात आली.तीन दिवस कोसळलेल्या ७.४३ मिमी अवकाळी पाऊस व गारपिटीने १९ गावांमधील ३१३.६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. यामध्ये बोरी खुर्द, शेलू बु., वेणी, अश्विनपूर, मोहा, रामनगर, नंदपूर, शिवानगर, सावरगाव गोरे, नानंद (ई), नानंद खुर्द, जामनाईक क्र.१, जामनाईक क्र.२, पिंपळगाव, पारध, बान्शी, मुंगशी, वडगाव, शेलू खुर्द आदी गावांतील गहू २११ हेक्टर, हरभरा ३५ हेक्टर, संत्रा २१ हेक्टर, ज्वारी १७ हेक्टर, हळद ४ हेक्टर, फुलशेती ५ हेक्टर आदी २० हेक्टरवरील भाजीपाला पिके पूर्णत: उद्ध्वस्त झाली. या १९ गावांतील २९५ शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. तसेच रबी हंगामातील पिकांचे उत्पादन घटले असून नुकसानग्रस्त शेतकरी शासनाकडून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणारतालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ यांनी सांगितले. यात शेती व फळ पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या नुकसानीचा समावेश करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असेही तहसीलदार प्रा. वाहूरवाघ यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी