दोन हजारांपैकी ३०० जणांना ‘हाय ब्लड प्रेशर’

By admin | Published: May 21, 2017 12:32 AM2017-05-21T00:32:02+5:302017-05-21T00:32:02+5:30

रक्तदाब तपासणीकडे सर्वसामान्य माणूस दुर्लक्ष करतो आणि त्यातूनच गंभीर आजार उद्भवतात.

300 people out of two thousand 'high blood pressure' | दोन हजारांपैकी ३०० जणांना ‘हाय ब्लड प्रेशर’

दोन हजारांपैकी ३०० जणांना ‘हाय ब्लड प्रेशर’

Next

आयएमएची तपासणी : गर्दीच्या ठिकाणी केली मोफत तपासणी, जनजागृती रॅलीत विविध संघटनांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रक्तदाब तपासणीकडे सर्वसामान्य माणूस दुर्लक्ष करतो आणि त्यातूनच गंभीर आजार उद्भवतात. हीच बाब हेरून यवतमाळातील डॉक्टरांनी चक्क रस्त्यावर उतरून दिवसभरात दोन हजार लोकांचे बीपी तपासले. गंभीर बाब म्हणजे, त्यात तब्बल ३०० जणांना उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) असल्याचे निष्पन्न झाले.
जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे हा आगळा उपक्रम राबविण्यात आला. जेथे लोकांची गर्दी असते अशा ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी जाऊन नागरिकांची मोफत रक्तदाब तपासणी केली. यामध्ये बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय अशा ठिकाणांचा समावेश होता. तत्पूर्वी जनजागृती रॅली काढण्यात आली. यात डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकीय प्रतिनिधींच्या संघटना सहभागी झाल्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धोटे यांनी आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. बी.एस.येलके यांनी हिरवी झेंडी दाखविली.
जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित ३०० शेतकऱ्यांची रक्तदाब तपासणी डॉ. हर्षवर्धन बोरा यांनी केली. तसेच स्लाईड शोद्वारे मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनीही सेवेचा लाभ घेतला. बसस्थानकावर डॉ. भरत राठोड यांनी स्लाईड शोद्वारे मार्गदर्शन केले. या उपक्रमात आयएमएसह आयएमएची लेडीज विंग, बालरोग तज्ज्ञ संघटना, स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना, वैद्यकीय प्रतिनिधींचा एमएसएमआरए, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मार्ड आणि इतर संघटनांनी सहभाग घेतला. अशा प्रकारचे वेगवेगळे लोकोपयोगी उपक्रम याहीपुढे घेणार असल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन बोरा आणि सचिव डॉ. स्वप्नील मानकर यांनी सांगितले.

Web Title: 300 people out of two thousand 'high blood pressure'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.