शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

पिता-पुत्रांनी केल्या ३० घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 9:29 PM

वाटमारीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत तब्बल ३० गुन्हे उघड झाले. इतकेच नव्हेतर उमरखेडमधील पिता-पुत्राची अट्टल टोळी जेरबंद करून १९ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्दे१९ लाखांचा ऐवज जप्त : पाच चोरटे ‘एलसीबी’च्या जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाटमारीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत तब्बल ३० गुन्हे उघड झाले. इतकेच नव्हेतर उमरखेडमधील पिता-पुत्राची अट्टल टोळी जेरबंद करून १९ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.यवतमाळ, उमरखेड, पुसद, महागाव या शहरामध्ये घरफोडी करणारी पिता-पुत्राची टोळी स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या हाती लागली. पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके पोफाळी पोलीस ठाण्यातंर्गत झालेल्या वाटमारीच्या गुन्ह्याचा तपास करताना अनिल दगडू काळे (३१) रा. आठवडी बाजार उमरखेड याला ३१ आॅक्टोबर रोजी अटक केली. त्याने पोलिसांचा बाजीराव पडताच यापूर्वी केलेल्या संपूर्ण गुन्ह्यांची कबुली दिली. मुख्य सूत्रधार अविनाश प्रकाश चव्हाण (२७), आकाश प्रकाश चव्हाण व त्यांचा पिता प्रकाश शेखर चव्हाण (५५) तिघेही रा. सिंचन कॉलनी उमरखेड , विकास भगाव बन (२१) रा. झाडगाव ता. उमरखेड अशी आरोपींची नावे आहेत. प्रकाश चव्हाण हा उमरखेड सिंचन विभागात चालक म्हणून कार्यरत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्य पणाला लावून या आरोपींकडून १६ लाख ७४ हजार रुपयांचे ४५७ ग्रॅम सोने, एक किलो ६० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. याशिवाय आरोपीने गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतूस, रोख ५० हजार रूपये असा १९ लाख ४ हजार ६८० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके करत असल्याची माहिती एसपी एम. राज कुमार यांनी दिली.पत्रपरिषदेला अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख मुकुंद कु लकर्णी उपस्थित होते. या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक सूरज बोंडे, संदीप चव्हाण, फौजदार संतोष मनवर, नीलेश शेळके, सहायक फौजदार साहेबराव राठोड, ओमप्रकाश यादव, जमादार गोपाल वास्टर, मुन्ना आडे, विशाल भगत, हरीश राऊत, मोहम्मद ताज मोहम्मद जुनेद, सतीश गजभिये, सुरेंद्र वाकोडे यांनी सहभाग घेतला.घरफोडीच्या ‘डिटेक्शन’ची पहिली मोठी कामगिरीचार आरोपींकडून एकाच वेळी घरफोडी व वाटमारीचे ३० गुन्हे उघड करून मुद्देमाल जप्त केल्याची ही ऐतिहासिक कामगिरी आहे. या तपासात एलसीबी प्रमुख मुकुंद कुलकर्णी यांनी आखलेली व्यूहरचना यशस्वी झाली. त्यांनी सर्व पथकांना एकत्र करून एकाचवेळी कारवाई केली. चोरीतील दागिने आरोपी विकत नसत. त्यामुळे ते जसेच्या तसे हस्तगत केले. 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस