ट्रॅव्हल्स अपघातात २५ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:30 IST2018-01-24T23:30:19+5:302018-01-24T23:30:41+5:30

25 passengers were injured in the accident | ट्रॅव्हल्स अपघातात २५ प्रवासी जखमी

ट्रॅव्हल्स अपघातात २५ प्रवासी जखमी

ठळक मुद्देटायर फुटला : महागाव-पुसद मार्गावरील घटना




लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : येथून पुसदकडे जाणाºया खासगी ट्रॅव्हल्सचा टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजता घडली.
महागाव येथून पुसदकडे जाणाºया खासगी ट्रॅव्हल्सचा (क्र.एम.एच.१२-एआर-३१०२) सारकिन्ही ते पिंपळगाव दरम्यान अचानक टायर फुटला. यामुळे ट्रॅव्हल्स रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात २० ते २५ प्रवासी जखमी झाले. त्यामध्ये शाळकरी मुलांचाही समावेश आहे. चालक शेख आबरार हा गंभीर जखमी झाला. सर्व जखमींना पुसद येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या ट्रॅव्हल्समध्ये ३५ प्रवासी होते, असे सांगितले गेले.
या मार्गावर अनेक खासगी वाहनातून प्रवास केला जातो. मात्र या खासगी वाहनांची स्थिती अत्यंत दयनीय दिसून येते. वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जादा प्रवासी बसविले जातात. वाहनाच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातून असे अपघात घडतात.

Web Title: 25 passengers were injured in the accident

टॅग्स :Accidentअपघात