शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

१५४ एटीएममध्ये ठणठणाट

By admin | Updated: May 11, 2017 01:04 IST

नोटबंदीच्या काळासारखी चलन टंचाई पुन्हा जिल्ह्यात उद्भवली असून जिल्ह्यातील १९८ पैकी १५४ एटीएममध्ये

जिल्ह्यात १९८ एटीएम : पैसे असलेल्या एटीएमपुढे रांगा लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : नोटबंदीच्या काळासारखी चलन टंचाई पुन्हा जिल्ह्यात उद्भवली असून जिल्ह्यातील १९८ पैकी १५४ एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट आहे, तर पैसे असलेल्या एटीएमपुढे नागरिकांच्या रांगा लागल्या आहे. ऐन पगार होण्याच्या काळातच एटीएममध्ये ठणठणाट असल्याने पगारदार चांगलेच वैतागले आहेत. जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे १९८ एटीएम आहे. त्यात सर्वाधिक एटीएम भारतीय स्टेट बँकेचे ८४ आहे. गेल्या १५ दिवसांपासून एटीएममध्ये पैसे मिळत नसल्याची ओरड सुरू आहे. कर्मचाऱ्यांचे पगार झाल्यानंतर ही ओरड आणखी तीव्र झाली. शहरातील प्रत्येक एटीएमचे शटर अर्धे ओढलेले दिसते, तर काही एटीएमवर पैसे नाही, एटीएम बंद असे फलक लावलेले दिसून येतात. जिल्ह्यातील केवळ ४४ एटीएममध्ये पैसे असल्याचे सांगितले जाते. त्यात अ‍ॅक्सिस बँकेचे ११ आणि सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे २३ एटीएमचा समावेश आहे. मंगळवारी दुपारनंतर स्टेट बँकेच्या शहरातील २४ पैकी निवडक एटीएममध्ये पैसे मिळू लागले. नोटबंदीच्या काळात ग्राहक पैशासाठी बँका आणि एटीएमपुढे रांगा लावून असायचे. अगदी अशीच स्थिती गत आठ दिवसांपासून झाली. प्रत्येक एटीएममध्ये ठणठणाट आहे. ग्राहक आशेने पैसे काढण्यासाठी जातात. पंरतु तेथे पैसेच नसतात. महत्त्वाच्या कामासाठीही पैसे मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. सकाळी पैसे असलेल्या एटीएममध्ये दुपारीच पैसे संपल्याचा फलक लागलेला असतो. ग्राहक या एटीएमकडून त्या एटीएमकडे पायपीट करताना दिसतात. केंद्र सरकारने काही दिवसांपासून कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देणे सुरू केले. तेव्हापासून हीच स्थिती कायम आहे. खात्यातील पैसे एटीएमकडे बँकांच्या एटीएमसाठी रिझर्व्ह बँकेच्या करन्सी सेकपोस्टवरून पैसे पाठविले जातात. परंतु यवतमाळ शहरातील एटीएमसाठी येथून पैसेच मिळाले नाही. जे पैसे आले तेही अत्यल्प होते. त्यामुळे जिल्ह्यातील काही बँकांनी आपल्या खातेदारांनी बँकांमध्ये जमा केलेले पैसे एटीएमकडे वळविले आहे. त्यातून मंगळवारी काही एटीएम सुरू झाले.