शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जिल्ह्यात नव्याने 110 पॉझेटिव्ह; दोघांचा मृत्यु,31 जणांना सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 19:50 IST

मृत झालेल्या दोन जणांमध्ये यवतमाळ शहरातील एक पुरुष व एक महिला आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात गत 24 तासात 110 नवीन पॉझेटिव्ह रुग्ण्‍ा आढळले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 31 जण ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

मृत झालेल्या दोन जणांमध्ये यवतमाळ शहरातील एक पुरुष व एक महिला आहे. 43 वर्षीय पुरुष हा 23 ऑगस्ट रोजी वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाला होता. पाच दिवसांपासून त्याला ताप व सर्दी होती. आज दुपारी त्याचा मृत्यु झाला. तर यवतमाळ शहरातील 44 वर्षीय महिला 21 ऑगस्ट रोजी वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाली होती. तिला आठ दिवसांपासून खोकला होता. तसेच तीन दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे 24 ऑगस्टच्या रात्री तिचा मृत्यु झाला.

24 तासात जिल्ह्यात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 110 जणांमध्ये 69 पुरुष आणि 41 महिला आहेत. यात यात महागाव तालुक्यातील पाच पुरुष व चार महिला, दारव्हा शहरातील दोन पुरुष व एक महिला, यवतमाळ शहरातील 27 पुरुष व 12 महिला, वणी शहरातील चार पुरुष व दोन महिला, दिग्रस शहरातील सात पुरुष व चार महिला, कळंब शहरातील दोन पुरुष, घाटंजी तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, पुसद शहरातील आठ पुरुष व आठ महिला, पांढरकवडा शहरातील एक पुरुष व एक महिला, झरी तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड शहरातील 10 पुरुष व सात महिला तसेच इतर ठिकाणच्या एका महिलेचा समावेश आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 663 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 212 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2824 झाली आहे. यापैकी 1881 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 68 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 181 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मंगळवारी 179 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 43873 नमुने पाठविले असून यापैकी 42634 प्राप्त तर 1239 अप्राप्त आहेत. तसेच 39810 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYavatmalयवतमाळ