सुदैवाने तीन बुडणाऱ्या बालकांचे वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 19:26 IST2019-04-10T19:26:08+5:302019-04-10T19:26:37+5:30
आगवन गावातील मोठापाडा या आदिवासी वस्तीतील आदित्य देवजी गोधाले (9वय), प्रीतम सुरेश महालुंगे(9वय) आणि त्याचा भाऊ सुयश सुरेश महालुंगे ...
आगवन गावातील मोठापाडा या आदिवासी वस्तीतील आदित्य देवजी गोधाले (9वय), प्रीतम सुरेश महालुंगे(9वय) आणि त्याचा भाऊ सुयश सुरेश महालुंगे (6 वय) ही शाळकरी मुले मंगळवार, 9 एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास नजीकच्या खाडीत खेकडे पकडायला गेली असताना भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाली. सुदैवाने सोबतचे मित्र मदतीला धावल्याने त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले असून त्यांना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.