थरार.. धबधब्यात अडकलेल्या १३ प्रवाशांचे त्यांनी वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 20:47 IST2018-07-08T20:43:55+5:302018-07-08T20:47:02+5:30
रत्नागिरी - धबधब्यावर मजा करण्यासाठी गेले आणि अचानक धबधब्याचे पाणी वाढल्याने १३ जण त्यात अडकले. मुसळधार पाऊस, पाण्याचा मोठ्ठा ...
रत्नागिरी - धबधब्यावर मजा करण्यासाठी गेले आणि अचानक धबधब्याचे पाणी वाढल्याने १३ जण त्यात अडकले. मुसळधार पाऊस, पाण्याचा मोठ्ठा आणि वेगवान प्रवाह यामुळे केवळ त्या पाण्यात अडकलेले प्रवासी नाही तर उपस्थित साऱ्यांचाच जीव टांगणीला लागला. त्याचवेळी तेथे असलेल्या रॅपलिंग करणाऱ्या एका ग्रुपने त्या साऱ्यांचा जीव वाचवला... एखाद्या चित्रपटातला वाटावा असा हा थरारक प्रकार घडला राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील सवतकडा धबधब्यावर. धबधब्यावर अडकलेल्या १३ पर्यटकांचे प्राण रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनियर्सच्या सदस्यांनी वाचवले. अडकलेले हे सर्व पर्यटक कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील आहेत.