Next

ओढ्यात शाळेची बस उलटली, पाच तरुणांमुळे वाचले ५२ मुलांचे प्राण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 20:06 IST2017-09-20T20:05:45+5:302017-09-20T20:06:22+5:30

कोरेगाव भीमा, दि. 20 : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथिल कमळीच्या मळ्याजवळ कोरेगाव भीमातील ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शालेय विद्यार्थ्यांच्या ...

कोरेगाव भीमा, दि. 20 : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथिल कमळीच्या मळ्याजवळ कोरेगाव भीमातील ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शालेय विद्यार्थ्यांच्या बसचा स्टिअरिंग रॉड निखळल्याने बसवरील नियंत्रण सुटून ती ओढ्यात उलटली. या वेळी बसमधील ५२ पैकी २० मुलांना दुखापत झाली, तर ५ मुले गंभीर जखमी आहेत. पाण्यात बुडालेल्या बसमधील मुलांना स्थानिक तरुणांनी बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. बसची वेळेवर दुरुस्ती होत नसल्याची व याच बसचा ६ महिन्यांपूर्वीही स्टिअरिंग रॉड निखळूनही शाळा व्यवस्थापनाने गांभीर्याने न घेतल्यानेच पुन्हा दुर्घटना घडल्याची तक्रार पालकांनी केली आहे.