Next

गरम पाण्यामुळे केसात होतो Dandruff? Washing Hair with hot water can cause Dandruff | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 11:03 AM2021-01-04T11:03:44+5:302021-01-04T11:05:03+5:30

हिवाळ्यात आपण कदाचित आपले केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करण्यास सुरवात केली असेल. या थंडगार हंगामात आता गरम पाणी कदाचित खूप आरामदायक वाटेल परंतु ते आपल्या केसांसाठी हानीकारक ठरु शकतं. बरेच लोक आपले केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणं पसंत करतात. यामुळे तेल आणि घाण निघते, आणि टाळू शुद्ध करू शकते. बहुतेक तज्ञांनी असं सुचवलं आहे की आपण आपल्या केसांवर गरम पाणी वापरणं टाळावे. यामुळे केस गळती वाढू शकते आणि केस कोरडे होउ शकतात. त्याऐवजी कोमट पाणी पर्याय म्हणून निवडा.