Next

कोर्टाच्या आवारात गँगस्टरची हत्या, आरोपींचे पोलिसांकडून एन्काउंटर | Delhi | Gangster Jitender Gogi

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 07:08 PM2021-09-24T19:08:17+5:302021-09-24T19:08:36+5:30

राजधानी दिल्लीत एक भयानक घटना घडली. भर कोर्टात गँगवॉर पहायला मिळाला. त्यातून गोळीबार झाला आणि या सिनेस्टाईल थरारात एका गँगस्टरसह दोन हल्ला करणारे ठार झालेत. दिल्लीतील रोहिणी कोर्ट परिसरात गँगस्टर जितेंद्र गोगी याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तारखेला आलेल्या गोगीवर वकीलाच्या वेशाल आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या. जितेंद्र गोगीला मारल्यानंत पळून जाणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जागीच ठार केलं. अद्याप या दोघांची ओळख पटलेली नाही. दोन गँगच्या जुन्या वादामुळे ही हत्या झाल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबारात एक महिला वकील जखमी झाल्याचं देखील बोललं जातंय. स्पेशल सेलच्या टीमने जितेंद्रला कोर्ट रूममध्ये नेले होते. तिथे हा थरारक प्रसंग घडला.

 

टॅग्स :दिल्लीन्यायालयगोळीबारdelhiCourtShooting