अन् रस्त्यावरच पेटल्या चुली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 16:56 IST2017-09-18T16:56:35+5:302017-09-18T16:56:50+5:30
नाशिक- केंद्र सरकारने पेट्रोल तसेच घरगुती वापराच्या एल पी जी गॅस सिलेंडर चे दर वाढवत असल्याने सर्व सामान्य नागरिकांना ...
नाशिक- केंद्र सरकारने पेट्रोल तसेच घरगुती वापराच्या एल पी जी गॅस सिलेंडर चे दर वाढवत असल्याने सर्व सामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. त्यासंदर्भात आज नाशिक मध्ये शिवसेनेच्या वतीनं रस्त्यावर चुली पेटवून अभिनव आंदोलन करण्यात आले. महिला आघाडीच्या या आंदोलनानंतर युवा कार्यकर्त्यांनी याच ठिकाणी मोटार बाईकची अंत्ययात्रा काढली.