Next

नाशिकमध्ये बिबट्यावर ड्रोणद्वारे नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 18:01 IST2017-10-03T18:00:08+5:302017-10-03T18:01:10+5:30

नाशिक - पंधरवड्यात दिंडोरी तालुक्यातील लखमापूर पंचक्रोशीत दोन बालके बिबट्यांच्या हल्ल्यात दगावल्याने नागरिकांमध्ये भीती अन् संताप व्यक्त होत आहे. ...

नाशिक - पंधरवड्यात दिंडोरी तालुक्यातील लखमापूर पंचक्रोशीत दोन बालके बिबट्यांच्या हल्ल्यात दगावल्याने नागरिकांमध्ये भीती अन् संताप व्यक्त होत आहे. या घटनांनी वनविभागाचीही झोप उडाली आहे. २२ पिंजरे संपूर्ण पंचक्रोशीत तैनात करण्यात आले आहे. ३५ ते ४० कर्मचारी सातत्याने उसाचे ‘जंगल’ पिंजून काढत आहे. याबरोबरच एक डझन ट्रॅप कॅ मेरे परिसरात बिबट्यांच्या पाऊलखुणा बघून सज्ज ठेवून ड्रोनद्वारेही रात्री बिबट्याचा माग काढत एकप्रकारे वनविभागाने जणू या भागात धुमाकूळ घालणा-या बिबट्यांना कैद करण्यासाठी ‘नजरकैद’ केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (व्हिडिओ अझहर शेख)