Next

राखी सावंत, बिचुकलेनंतर सदावर्ते बिग बॉसमध्ये जाणार? Gunaratna Sadavarte in Marathi Bigg Boss?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 03:08 PM2021-12-11T15:08:02+5:302021-12-11T15:08:38+5:30

गुणरत्न सदावर्ते... गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेत... व्यवसायाने वकील आणि कायद्याचं ज्ञान ही त्यांची ओळख आहे... चर्चेतले आणि महत्त्वाचे अनेक खटले त्यांनी लढलेयत... असं असलं तरी, ते त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे, त्यांच्या भाषणांमुळे आणि त्यांच्या घोषणांमुळे ते अधिकच चर्चेचा विषय ठरतात... सध्या सदावर्ते एसटीच्या आंदोलनात बिझी आहेत. एसटीचं विलीनीकरण व्हावं म्हणून ते आझाद मैदानात ठाण मांडून बसलेयत... तिथंही ते ज्या घोषणा देतायत त्या प्रचंड व्हायरल होतायत...