Next

दारुने रुग्ण बरे करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल होणार? Case File on Dr Arun Bhise | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 01:33 PM2021-05-14T13:33:22+5:302021-05-14T13:33:52+5:30

अहमदनगरमधील डॉक्टर अरुण भिसे यांनी दारू प्यायल्याने रुग्ण कोरोना मुक्त होतो, असा अजब दावा केला होता... ज्यामुळे खळबळ उडवून उडाली होती... नगर जिल्ह्यात यापूर्वीही अहमदनगर शहरातील तथाकथीत वैद्य बबन शिंदे यांनी आपण कोरणा वरील औषध शोधल्याचा दावा केला होता.... पुढे या औषधाचं काय झालं? त्याचं उत्तर लोकांना आजवर मिळालं नाही... तसाच दावा आत्ता डॉक्टर अरुण भिसे यांनीही केला... ते तर व्यवसायाने डॉक्टर आहेत. हे दोन्ही दावे समाज माध्यमांमध्ये जोरदार चघळले गेले. दारूने कोरोना बरा होतो म्हटल्यावर अनेक तळीरामांना हायसं वाटलं. मात्र लोकमतने यात सुरुवातीपासूनच शंका उपस्थित करत वैज्ञानिक भूमिका घेतली होती.... डॉक्टर भिसे यांचा दावा ऐकून लोकमत ने 11 मे रोजी वृत्त प्रकाशित केलं आणि त्यात प्रशासनाला याबाबत विचारणा केली.... आम्ही चौकशी सुरू केली असल्याचं प्रशासनाने लोकमतला सांगितलं.... पण अद्याप पर्यंत प्रशासनाने कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही... शेवगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी डॉ. भिसे यांना बाबत खुलासा विचारला होता. त्या खुलाशावर भिसे यांनी काय उत्तर दिले ते ऐका...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याऔषधंडॉक्टरअहमदनगरcorona virusmedicinedoctorAhmednagar