रुग्ण दुप्पट होण्याचा वेग पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षाही भयानक का आहे? Corona 3rd Wave Maharashtra
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 16:37 IST2021-12-30T16:36:59+5:302021-12-30T16:37:16+5:30
Covid (corona) third wave in maharashtra-Mumbai latest update : राज्यात अचानक रुग्ण वाढायला लागलेत. रुग्ण मिळण्याचा आणि तो दुप्पट होण्याचा वेग हा भयानक आहे. विशेषत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही इतक्या वेगानं रुग्णवाढ झालेली नव्हती. म्हणजे पहिल्या लाटेत रुग्ण दुप्पट व्हायला १२ दिवस लागले, तिच संख्या दुसऱ्या लाटेत २० दिवस होती. मात्र चिंतेची बाब म्हणजे गेल्या फक्त चारच दिवसात राज्यात रुग्ण दुप्पट झालेत, मुंबईत तर ७० टक्के रुग्वाढ झालीय. राज्यात अचानक रुग्ण का वाढतायंत, पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार राज्यावर आहे का, रुग्ण दुप्पट व्हायचा दर आधीच्या दोन लाटांपेक्षा जास्त का आहे, हे सगळं कुठे जाऊन थांबणार आहे, यावरच बोलुयात पुढच्या ३ मिनिटात पण त्याआधी पाहुयात मुंबईत काय परिस्थिती आहे ते...