Next

रिलायन्सची धुरा कोणाकडे जाणार? Mukesh Ambani Speaks Of Leadership Transition At Reliance Industries

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 05:28 PM2021-12-30T17:28:35+5:302021-12-30T17:28:59+5:30

मुकेश अंबानी यांना तीन अपत्ये आहेत. इशा, अनंत आणि आकाश. अंबानींकडे सध्या जगभरातील 1000 हून अधिक कंपन्या आहेत. आता या कंपन्यांचा उत्तराधिकारी कोण होणार, कोणाकडे कोणती कंपनी दिली जावी, यावर अंबानी विचार करत आहेत. मुकेश अंबानींची ही संपत्ती 94 अब्ज डॉलर्स तर त्यांच्या कंपन्यांचे साम्राज्य हे 208 अब्ज डॉलर असल्याचं सांगितलं जातंय..एवढी प्रचंड संपत्ती आणि कंपन्यांची जबाबदारी विभागून देण्याचं मोठे जिकिरीचं काम मुकेश अंबानी यांना करावं लागणार आहे. सध्या या समुहामध्ये नीता अंबानी, इशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांचे समभाग आहेत. गेल्या दहा वर्षांत अंबानींच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे.