Next

रश्मी ठाकरे मुख्यमंत्री व्हाव्यात असं नेमकं कुणाला वाटतंय? Rashmi Uddhav Thackeray | Maharashtra CM

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 17:28 IST2022-01-05T17:27:50+5:302022-01-05T17:28:09+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचं नाव अलिकडे वारंवार चर्चेत येतंय... विशेष म्हणजे रश्मी ठाकरे यांच्या नावाभोवती मुख्यमंत्रिपदाची चर्चाही होताना दिसतेय... भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी तर रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही.. इथवर जाऊन वक्तव्य केलं होतं.. तर आता एका शिवेसना नेत्यानेच रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. त्यांच्याकडे राज्याचं प्रमुखपद दिलं तर कोणाचीही हरकत नसेल, असं वक्तव्य केलंय.. आणि त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचं नाव आणि मुख्यमंत्रिपद यांची एकत्रित चर्चा सुरु झालेय... रश्मी ठाकरे यांचं नाव वारंवार मुख्यमंत्रिपदासोबत का घेतलं जातंय? या विषयी बोलूयात..