राहुल गांधी जे म्हणाले तेच खरं झालं ! Rahul Gandhi Speech on Farmer's Law
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 14:31 IST2021-11-26T14:31:25+5:302021-11-26T14:31:46+5:30
देशाच्या राजकारणात राहुल गांधी हे एक मोठं नाव आहे... भाजपकडून त्यांची वेळोवेळी खिल्ली उडवली जाते. पण अलिकडच्या काळात राहुल गांधीचं राजकारण अनेकांना धक्का देईल, असं राजकीय जाणकार सांगतात. राजकारणात दिवसेदिवस ते अधिक परिपक्व होतायत. आक्रमकपणे आपले मुद्दे मांडताना दिसतात. राहुल गांधीची राजकारणातील प्रतिमा आता बदलताना दिसतेय. शेतकरी आंदोलनाचा राहुल गांधींच्या प्रतिमेवर सकारात्मक बदल झालाय.. शेतकरी आंदोलन सुरु असताना राहुल गांधींनी अनेकवेळा ठामपणे सांगितलं होतं, की केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे हे सरकारला मागे घ्यावेच लागतील.