Next

शिवसेना नेत्याने किरीट सोमय्यांना कोणती माहिती दिली? Mahavikas Aghadi Government | Vaibhav Khedekar

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 09:09 AM2021-09-22T09:09:45+5:302021-09-22T09:10:19+5:30

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात मोर्चा उघडलाय. सोमय्यांनी शिवसेना नेत्यांपासून सुरुवात केली आणि आता राष्ट्रवादींच्या नेत्यांवरही त्यांनी घोटाळ्याचे आरोप केलेत. सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू मंत्री अनिल परब यांच्यावरदेखील आरोप केले होते. आता या आरोपांवर मोठा गौप्यस्फोट मनसे नेत्याने केलाय. मनसे नेते वैभव खेडेकर यांनी शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केला. रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधातील पुरावे किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा खेडेकर यांनी केला आहे.