अविघ्न पार्कला आग, इमारतीशी नारायण राणेंचा संबंध काय? Narayan Rane's Connection with Avighna park
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 13:06 IST2021-10-23T12:45:14+5:302021-10-23T13:06:10+5:30
आज मुंबईतील एका उच्चभ्रु इमारतीला आग लागली. वन अविघ्न पार्क असं या ६० मजली इमारतीचं नाव आहे. या भीषण आगीत एका व्यक्तीचा जीव वाचवताना १९ व्या मजल्यावरुन पडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा एक व्हिडीओदेखील व्हायरल होतोय. १९ व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु होतं, त्यावेळी ही आग लागली असं सांगितलं जातंय. आग लागल्यानंतर लालबाग-परळ परिसरात आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. त्यानंतर या घटनेची राज्यभरात चर्चा झाली.