नवाब मलिकांची चौकशी सुरु असताना ट्विटरवर वॉर... Twitter war after Nawab Malik ED Inquiry
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 17:25 IST2022-02-23T17:25:12+5:302022-02-23T17:25:29+5:30
भल्या पहाटे पाच वाजता सुमारास मंत्री नवाब मलिक यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली... आणि त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास त्यांनी ईडीने आपल्या कार्यालयात नेलं.. त्यानंतर जे सुरु झालं ते आता थांबणार नाही असंच दिसतंय.. आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. काहींनी कारवाईला योग्य म्हटलंय, तर ही कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचं काहींनी म्हटलंय.. एकीकडे मलिकांची चौकशी सुरु असताना मलिकांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट करण्यात आलंय.. आणि त्याची चर्चाही रंगलीय..