Next

उद्धव ठाकरेंना पाठदुखी-मानदुखीचा त्रास; रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता | CM Uddhav Thackeray Health

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 16:57 IST2021-11-09T16:57:07+5:302021-11-09T16:57:23+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठिकठाक नाही, त्यांना मणका आणि स्नायूंच्या दुखापतीचा त्रास आहे त्यामुळे लवकरच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असं सांगितलं जातंय. उद्धव ठाकरेंना स्नायूंचं दुखणं आणि मणक्याचा आजार बळावलाय, गेल्या आठवड्यापासूनच त्यांना हा त्रास सुरु आहे, त्यातही शक्य तितक्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या पण आता हा त्रास जास्त गंभीर होत असल्यानं त्यांना थेट रुग्णालयात दाखल करावं लागणार आहे असं समजतंय.