Next

गुन्हा दाखल न करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडून हवालामार्फत 50 लाख घेतले Parambir Singh | Mumbai

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 14:12 IST2021-11-11T14:11:35+5:302021-11-11T14:12:06+5:30

100 कोटी वसुलीचा लेटर बॉम्ब टाकून फरार झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.. परमवीर सिंग प्रकरणात दोन पोलिस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणाला आणखी नवीन वळण मिळाले आहे.. या पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी परमवीर सिंग यांच्या सांगण्यावरूनच पन्नास लाख रुपये घेतल्याचा कबुलीजबाब दिला आहे..