भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना कधी नव्हे ते थोरल्या पवारांनी शुभेच्छा दिल्या, पण का? Sharad Pawar
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 14:18 IST2021-12-29T14:18:02+5:302021-12-29T14:18:27+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोघेही कट्टर राजकीय विरोधक आहेत.. वेळ मिळेल तेव्हा दोघेही एकमेकांवर तोंडसुख घेण्याची एकही संधी सोडत नाही.. चंद्रकांत पाटलांनी तर अनेकदा शरद पवारांवर टीका केली, एकेरी भाषेत त्याचा उल्लेख केला.. आणि कधीतर शरद पवारांवर पीएचडी करावीशी वाटते असं सांगून त्यांच कौतुकही केलय.. परंतु आजवर अनेकदा शरद पवार यांनी आपल्या शांत आणि संयमी भाषेतच चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलय.. परंतु सोमवारी सातार्यात असणाऱ्या शरद पवारांनी कधी नव्हे ते चंद्रकांत पाटलांना चक्क शुभेच्छा दिल्या...