Next

ST Worker strike एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव, ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 14:15 IST2021-11-25T14:14:42+5:302021-11-25T14:15:04+5:30

राज्यात एसटीची चाकं ठप्प आहे.. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होतायत.. पण अस असतानाही सर्व स्तरातून लोक एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देतायत. मुंबईत आझाद मैदानात १५ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्याचं आंदोलन सुरु आहे. एसटीच्या विलीनीकरणासाठी हा लढा सुरु आहे. पण आता या लढ्यात नक्षलवाद्यांचा शिरकाव झाल्याची चर्चा सुरु झालीय.. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव झाल्याचा धक्कादायक दावा संपकऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला. एस.टी. महामंडळाने संपाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी हा दावा केला.