Next

ठाकरे, परब, देशमुखांबाबत धक्कादायक खुलासे | Sachin Vaze, Anil Parab, Param Bir Singh | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 04:10 PM2022-02-04T16:10:24+5:302022-02-04T16:10:44+5:30

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री अनिल परब तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ईडीला दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती उडल केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मला सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याच्या सूचना केल्याचा दावा परमबीर सिंह यांनी ईडीकडे केलाय. त्याचबरोबर सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेतल्यानंतर गुन्हे शाखेत महत्वाच्या पदावर नियुक्ती द्या असंही आपल्याला सांगण्यात आलं होतं, असं परमबीर सिंह यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलंय. तसेच अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्याकडून पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात यादी मला दाखवली जायची, मुंबईतल्या बदल्यांमध्ये अनिल परब आणि अनिल देशमुख यांचा हस्तक्षेप होता असा दावाही परमबीर सिंह यांनी केलाय. वाझेनं मला सांगितलं होतं की पुन्हा पोलीस दलात येण्यासाठी त्याच्याकडून अनिल देशमुख यांनी दोन कोटी मागितले होते, असा धक्कादायक खुलासाही परमबीर सिंह यांनी ईडीकडे केलाय-