Next

दुर्गापूजेनिमित्त राजापुरात एकवटली नारी शक्ती, लोकमत-मित्रमेळाचा स्तुत्य उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 22:15 IST2017-09-24T22:14:50+5:302017-09-24T22:15:22+5:30

‘ती’ दुर्गेचाच अवतार आणि तिच्या हातूनच दुर्गेची आरती.. ‘ती’नं आरती केलीच, शिवाय ढोलवादन करूनही दुर्गेला अभिवादन केलं. उपक्रम होता ...

‘ती’ दुर्गेचाच अवतार आणि तिच्या हातूनच दुर्गेची आरती.. ‘ती’नं आरती केलीच, शिवाय ढोलवादन करूनही दुर्गेला अभिवादन केलं. उपक्रम होता राजापुरातील दुर्गाशक्तीचा जागर आणि राजापूर शहरातील श्री देव चव्हाटा मित्रमंडळ यांनी प्रतिष्ठापना केलेल्या देवीच्या मंडपात असंख्य ‘ती’ जमल्या. राजापुरातील मित्रमेळा आणि ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या महिलांच्या सामुदायिक आरतीच्या उपक्रमाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.